एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या; आरोपीचाही आत्महत्येचा प्रयत्न

अमरावती (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे एकतर्फी प्रेमातून माथेफिरू तरुणाने एका 17 वर्षीय तरुणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान, तरुणीचा खून केल्यानंतर आरोपीने देखील स्वतःच्या पोटात चोकू भोसकून आत्महत्येचा प्रयत्न केला.

 

धामणगाव रेल्वे येथे एका गार्डनमध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणीच्या पोटात धारदार शस्त्राने वार करून खून केला. यानंतर आरोपी तरुणाने स्वतःच्या पोटातही चाकू भोसकून घेतल्याने तोही गंभीर जखमी झाला. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून याची पाहणी केली.

Protected Content