जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील श्रीराम चौकात किरकोळ कारणावरून दाम्पत्याला शिवीगाळ करत डोक्यावर विट मारून दुखापत केली. त्यानंतर दमदाटी करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी १९ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनीपेठ पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राजेंद्र रामदास पाटील वय ५५ रा. श्रीराम चौक, जळगाव हे आपल्या पत्नीसह वास्तव्याला असून मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घराच्या शेजारी भूषण कैलास गायकवाड वय २४ हा राहतो. शुक्रवारी १९ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता भूषण गायकवाड यांच्या घरातील घूर हा राजेंद्र पाटील यांच्या घरात आला. याचा जाब विचारला असता भूषण कैलास गायकवाड याने राजेंद्र पाटील व त्यांची पत्नी या दोघांना शिवीगाळ केली. तर हातील विट मारून फेकल्याने राजेंद्र पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार सायंकाळी ७ वाजता भूषण गायकवाड याच्या विरोधात शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.