वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विजेचा धक्का लागल्याने ईलेक्ट्रीक पोलवरून खाली पडल्याने एकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजता भुसावळ तालुक्यातील शिंदी गावात घडली आहे. याप्रकरणी दुपारी १२ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुनिल अशोक सपकाळे वय ४५ रा. शिंदी ता. भुसावळ असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुनिल सपकाळे हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होते. मंगळवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजता ते ईलेक्ट्रीक पोलवर काम करत असतांना त्यांना विजेचा धक्का बसला. त्यात ते पोलवरून खाली पडले, यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाले. त्यांना तातडीने वरणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ नावेद अली हे करीत आहे.