गोलाणी मार्केटसमोरून एकाची दुचाकी लांबविली; शहर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील अमर रगडा येथून तरूणाची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी  चोरून नेल्याची घडना उघडकीला आली आहे. याप्रकरणी रविवारी ३० जानेवारी रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, निलेश जगदीश जगताप (वय-३०) रा. रायसोनी नगर जळगाव हा तरूण खासगी नोकरीला आहे. २५ जानेवारी रोजी निलेश जगताप हा कामाच्या निमित्ताने (एमएच १९ एचटी ९२६४) या दुचाकीने शहरातील गोलाणी मार्केट येथे आला दुपारी ३ वाजता आल. गोलाणी मार्केटमधील अमर रगडाच्या दुकानासमोर दुचाकी पार्क करून लावली होती. सायंकाळी ७ वाजता काम आटोपून घरी जाण्यासाठी दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोधाशोध करून दुचाकी मिळून आली नाही. अखेर रविवारी ३० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश बोरसे करीत आहे.

Protected Content