सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । आज येथील एक रूग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी याला दुजोरा दिला आहे.
आज सावदा शहरातील ४४ वर्षे वय असणारा व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे. या वृत्ताला मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे. या रूग्णाचा रहिवास असणारा परिसर आता कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून यात भागात फवारणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, आजच्या रूग्णामुळे सावदा येथील एकूण कोरोना बाधीत रूग्णांची संख्या ६२ झालेली आहे. यातील नऊ जणांचा मृत्यू झाला असून तीन जणांवर उपचार सुरू आहे. तर उर्वरित रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.