भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील जुना सातारा रोडवर माजी नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांची बुधवारी २९ मे रोजी रात्री ९.३० वाजता गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलीसांनी यापुर्वी तीन जणांना अटक करण्यात आली. या चौकशीत गावठी पिस्टल घरात ठेवल्याच्या संशयावरून शनीवारी १ जून रोजी दुपारी ४ वाजता संशयित आरोपी किरण कोळी वय -३५ रा. अकलूद ता. यावल याला अटक केली आहे. आता अटकेतील संशयितांची संख्या ४ वर पोहचली आहे.
भुसावळ शहरातील जुना सातारा रोडवर पुर्ववैमनश्येतून माजी नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्यावर हल्लेखोरांनी गाळीबाळ करून हत्या केल्याची घटना बुधवारी २९ मे रोजी रात्री ९.३० वाजता घडली होती. या घटनेमुळे भुसावळ परिसरात मोठी खळबळ उडाली होती. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक राजू भागवत सुर्यवंशी, बंटी पथरोड, शिव पथरोड, विनोद चावरिया यांच्यासह ११ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. यातील विनोद चावरिया आणि राजू सुर्यवंशी यांना गुरूवारी ३० मे रोजी पोलिसांनी गजाआड केले होते. तर, या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी करण पथरोड याला देखील पोलीसांनी ३१ मे रोजी रात्री नाशिक येथील द्वारका नगरातून अटक केले होते. पोलीसांनी केलेल्या चौकशी करण्यात आली. यात अटकेतील आरोपी करण पथरोड याने इंदौर येथून आणलेली तीन गावठी पिस्टल अकलूद, ता. यावल येथील किरण कोळी (वय-३५) या संशयीताकडे ठेवल्याचे तपासात समोर आल्यानंतर या संशयीताला शनिवारी १ जून रोजी दुपारी ४ वाजता अटक करण्यात आली. दुहेरी हत्याकांडातील आरोपींची संख्या आता चार झाली आहे.
अटकेतील संशयित आरोपींनी हत्या करण्याच्या उद्देशाने इंदौर येथून तीन गावठी पिस्टल व सुमारे ३० वर जिवंत काडतूस खरेदी केले व हा शस्त्रसाठा अकलूद, ता. यावल येथील किरण कोळी या संशयीताच्या घरात ठेवला. हत्याकांडाच्या आदल्या दिवशी हल्लेखोरांनी तिघे गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेवून बुधवारी २९ मे रोजी रोजी रात्री ९.३० वाजता संतोष बारसे व अनील राखुंडे यांची गोळ्या झाडून हत्या केली.