जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मोबाईलवर अनोळखी क्रमांकावर आलेल्या लिंकवर क्लिक करणे शहरातील व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. या घटनेत व्यावसायिकाची १ लाख रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाली असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील द्रोपदी नगरात निर्मलकुमार लखमीचंद चांदीवाल (वय-६०) हे वास्तव्यास आहेत. रविवारी २६ जून रोजी घरी असतांना त्यांना त्यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमाकांवरुन एक लिंक आली. या लिंकवर क्लिक केले असता, अनोळखी व्यक्तीने चांदीवाल यांच्या बँक खात्यातून १ लाख रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केली. फसवणुकीची खात्री झाल्यावर निर्मलकुमार चांदीवाल यांनी याबाबत जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वागळे हे करीत आहेत.