राज्यभरातून एक लाख २५ हजार परीक्षार्थींनी दिली सेट परीक्षा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्‍यस्‍तरीय पात्रता परीक्षा (सेट) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोव्‍यात ७ एप्रिल रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेला राज्‍यभरातून एक लाख २५ हजार परीक्षार्थी सामोरे गेले.

यंदाची सेट परीक्षा ही शेवटची ऑफलाइन परीक्षा असल्‍याने परीक्षार्थींच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली होती. दरम्‍यान, रविवारी सकाळी दहा ते अकरादरम्‍यान पेपर क्रमांक एक झाला; तर सकाळी साडेअकरा ते दुपारी दीड या वेळेत पेपर क्रमांक दोन झाला. परीक्षार्थींमध्ये कमालीचा उत्‍साह होता. महिला उमेदवारांचे प्रमाण लक्षणीय होते. सर्व परीक्षार्थींसाठी पेपर क्रमांक एक सारखाच होता. पेपर क्रमांक दोन हा त्‍या-त्‍या परीक्षार्थींच्‍या विशेष विषयावर आधारित होता.

 

 

Protected Content