चाळीसगाव, प्रतिनिधी | शुक्रवार २५ ऑक्टोबर रोजी चाळीसगाव ते मालेगाव रोडवर आयसर गाडीने जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. यासंदर्भात आयसर गाडीचालकाविरोधात गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे.
पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी प्रफुल्ल किशोर पवार हे चाळीसगाव ते मालेगाव रोडवरील अष्टविनायक हॉटेलच्या कार्नरवर त्यांची मोटर सायकल (एम.एच १९ सी.एन ६००७ ) सायंकाळी उभी करत असतांना आयसर (एम.एच १८ ऐऐ ०६१४) ही गाडी भरधाव येत असल्याचे त्यांना दिसली. यावेळी त्यांनी त्यांच्या हातातील मोटर सायकल सोडून दिल्याने ते थोडक्यात बचावले. मात्र गाडीला जोरदार ठोकर मारून नुकसान केले. यानंतर ही आयशर गाडी शितल मोटर समोरील मयूर विश्वासराव भोसले यांच्या कपडे प्रेस करण्याच्या टपरीला धडक देऊन थांबली. यात टपरी सामोरील दोन सायकलीसह टपरीचे देखील नुकसान झाले. दरम्यान, ओम सायकल मार्टचे विकास राजपूत व तेथील काही नागरिकांनी आयसर चालकास पकडून त्याच्या नावाची विचारपूस केली असता त्याने सुरेश उर्फ बंडू राम मराठे असल्याचे सांगितले. तो तळोदा तालुक्यातील चीनोदा येथील रहिवाशी असुंन हल्ली धुळे जिल्ह्यातील वरखेडी येथे राहत असल्याचे सांगितले. त्यावेळी फिर्यादी प्रफुल्ल पवार यांचा मित्र अक्षय शिंदे हा तेथे आला व त्याने सांगितले की, आयशर चालकाने हनुमान मंदिरासमोरील स्पीड ब्रेकर समोर भरत साळुंके व जितेंद्र देशमुख या दोघांच्या वेगवेगळ्या मोटर सायकल यांना आयशरने धडक दिली. यात भरत व जितेंद्र यांना जास्त मार लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, भरत माधवराव सांळुखे हा मयत झाल्याची खबर प्रफुल्ल पवार यांचे मित्र अक्षय शिंदे यांनी सांगितल्याने पवार यांनी आयशर चालका विरोधात फिर्याद दाखल केली आहे.