जळगाव प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी रोडवरील जाखनीनगर कंजरवाडा भागात भांग विक्रेत्या महिलेच्या घरी छापा टाकून एक किलो ओलीभांग सह इतर साहित्य जप्त केल्याची कारवाई आज सायंकाळी केली. याप्रकरणी संशियत महिलेस ताब्यात घेतले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
रिया विक्की दहियेकर (वय-२३) रा. जाखनी नगर कंजरवाडा असे अटक केलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हेमंत कळसकर, चेतन सोनवणे, सुधीर साळवे, आसमी तडवी गोविंदा पाटिल, अशांच्या पथकाने गुप्त माहितीच्या अधारावर कंजरवाडा परिसरात आज सोमवारी २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता छापा टाकला असता पायघन हॉस्पीटल समोरच रिया विक्की दहियेकर (वय-२३) हि महिला पेालिस ताफा संशयितरित्या हालचाली करतांना आढळून आली. तिची महिला पोलीसांनी तपासणी केल्यावर तिच्या जवळून १ किलो ओली भांग आढळून आले.
याप्रकरणी संशयित महिलेला एमआयडीसी पोलीसांनी तिला ताब्यात घेतले. महिला पोलिस अश्वीनी प्रभाकर इंगळे यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरा पर्यंत कंजरवाड्यात सर्च ऑपरेशन सुरु होते.