पहूर येथे भव्य आरोग्य शिबिरात शंभर रुग्णांनी घेतला लाभ

पहूर, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वर्गीय रामराव पाटील व स्वर्गीय मैनाबाई पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पहूर येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर गोदावरी फाउंडेशन आणि डॉ. उल्हासराव पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा शंभर रुग्णांनी लाभ घेतला. शिबिराचे उद्घाटन गुरुवारी (ता. १० एप्रिल) सकाळी पहूर पेठ केंद्र शाळेत दूध फेडरेशनचे संचालक अरविंद देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ॲड. संजय पाटील आणि अनिल पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

या शिबिरात विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थितांना वैद्यकीय सेवा दिली. डॉ. पारितोष (एम.डी. मेडिसिन), डॉ. आकाश (एम.डी. मेडिसिन), डॉ. सौरभ (एम.एस. ऑर्थो), डॉ. अनिश (एम.एस. ऑप्थाल्मोलॉजी), डॉ. आदित्य (एम.एस. सर्जरी), डॉ. शुभम (एम.एस. ईएनटी) यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. याशिवाय परिचारिका व जनसंपर्क अधिकारी विशाल शेजवळ यांचे विशेष सहकार्य लाभले.

या वेळी भास्कर पाटील, साहेबराव देशमुख, किरण खैरनार, शेख सलीम शेख गनी, सरपंच अफजल तडवी, शंकर जाधव, सरपंच आशाताई जाधव (सरपंच, पहूर कसबे), राजधर पांढरे, समाधान पाटील, रामेश्वर पाटील, सचिन देशमुख, रवी देशमुख, महेश पाटील, अशोक पाटील, बाबुराव घोंगडे, अनिल जाधव, दिलीप बाविस्कर, गोकूळ देशमुख, अर्जुन बारी आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत व दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content