चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चैतन्य तांडा येथे लवकरच मनरेगा योजनेच्या अंतर्गत जलशक्ति अभियान राबविण्यात येणार असून या अभियानांतर्गत शंभर टक्के शौच खड्यांचा गाव म्हणून उदयास येणार आहे. या पाश्वभूमीवर गटविकास अधिकारी यांनी आज चैतन्य तांडा येथे लोकसहभागातून बनवलेल्या शौच खड्यांची पाहणी केली.
राज्य शासनाचा मनरेगा योजनेच्या अंतर्गत जलशक्ति अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत शंभर टक्के सौच खड्यांचा गाव बनविण्याचे लक्ष आहे. त्यात चैतन्य तांडा क्रमांक 4 ची मॉडेल गावाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांना आज चैतन्य तांडा येथे जाऊन लोकसहभागातून बांधण्यात आलेल्या सौच खड्डांची पाहणी केली. दरम्यान १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुस्तके आणलेली आहे. त्याचे प्रकाशन गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्याहस्ते करण्यात आले.
पहिली ते पदवीधर पर्यंत व स्पर्धा परीक्षांची सर्व पुस्तके असे एकूण तीस हजार रुपयांचे पुस्तके आणण्यात आलेले आहे. हे पुस्तके १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून घेण्यात आले आहे. गावात कोणकोणत्या ठिकाणी सौच खड्डा बांधण्यात आले आहे. तिथे जाऊन खुद्द गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी पाहणी केली. यावेळी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, विस्तार अधिकारी आर.आय.पाटील, विस्तार अधिकारी शिर्के आण्णा, सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंदा राठोड, सदस्य वसंत राठोड, उदय पवार, ग्रामसेवक कैलास जाधव, मराज राठोड, करगाव सोसायटीचे माजी चेअरमन दिनकर राठोड आदी उपस्थित होते.