पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा येथील एका ४२ वर्षीय मजुराचा पाय घसरून नदी पात्रात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सावखेडा ता. पाचोरा येथील शंकर मोहन गोपाळ (वय – ४२) हे हात मजुरी करुन आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवत होता. दि. २ जुन रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास मजुरीसाठी जात असतांना येथील बहुळा नदी पात्रात नजीक शंकर गोपाळ यांचा पाय घसरून ते पाण्यात पडले. ही घटना एका लहान मुलाने ग्रामस्थांना कळविल्यानंतर ग्रामस्थांनी शंकर गोपाळ यास बाहेर काढून तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत शंकर मोहन गोपाळ यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक भाऊ असा परिवार आहे.