*चाळीगाव (प्रतिनिधी)* तालुक्यातील खडकी येथील एकाचा आज पहाटे धावत्या रेल्वेत येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र महादू डोखे हे पहाटे पाच वाजता शौचास जात असताना अंधारात येणारी रेल्वे न दिसल्याने धावत्या रेल्वे खाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले असून खडकी येथे संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पश्चात पत्नी तीन मुले, असा परिवार असून सदर मृत्यू हा अपघात की, आत्महत्या याबाबत खडकी परिसरात विविध चर्चा सुरू आहेत.