जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘इंटरनल क्वॉलीटी अशरन्स विभागा’तर्फे “टेक्नीकल एज्यूकेशनमध्ये नॅकचे महत्व” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आज करण्यात आले.

मंगळवार, दि. १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता संपन्न झालेल्या या कार्यशाळेत आयएमआर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शिल्पा बेंडाळे या प्रमुख वक्ता यासह अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, प्रा. संजय दहाड उपस्थित होते. कार्यशाळेचे आयोजन इंटरनल क्वालिटी अशुरन्स विभागाच्या समन्वयक डॉ. प्रज्ञा विखार याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी नॅकची प्रोसेस आणि मुल्यमापन पध्दती याची माहिती सांगत नॅकमुळे होणाऱ्या गुणवत्ता सुधार यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सहभागी प्राध्यापकांच्या प्रश्नांवर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेत महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख आणि प्राध्यापक यांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. राहुल पाटील, प्रा. अविनाश सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.


