जळगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती, कास्ट्राईब कमर्चारी महासंघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा जळगाव व जिल्हा परिषद, जळगाव सर्व संघटनांची समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन यांच्यातर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवशी लाक्षणिक संप जिल्हा परिषद आवारात करण्यात आला.
आंदोलनकर्त्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, ७ व्या वेतन आयोगात बराचश्या त्रुटीं असून त्या दूर करण्यात यावेत. बक्षी समितीने जो दुसरा खंड जो अद्याप शासनाने मंजूर केलेला नसून तो आचारसंहिते पूर्वी मंजूर करावा. जिल्हा परिषदेत कंत्राटी कर्मचारी मागील ८ ते १० वर्षांपासून कमी मानधनावर काम करीत आहेत त्यांना सेवेत कायम करण्यात यावेत. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती रखडलेल्या असून त्यांना त्वरित पदोन्नती देण्यात यावी. केंद्राने ७ व्या वेतन सोबत विविध भत्ते लागू केले आहेत. मात्र, राज्य सरकाने केवळ ७ वे वेतन लागू केले असून विविध भत्ते लागू केलेले नाहीत. राज्यात वेतन श्रेणी बदलल्यामुळे चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्यांकडून अवाजवी वसुली सुरु असून ती वसुली थांबवून त्यांना दिलासा द्यावा, अनुकंप भरती विनाअट कारावी, लिपिक व लेखा लिपिक यांच्या ग्रेड पे मध्ये सुधारणा करण्यात यावी. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.