यावल प्रतिनिधी । संगणक परिचालकांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील एकूण संगणक संघचालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 19 पासून सुरू असलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनातील एक भाग म्हणून आज दि. 28 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहेत.
परिचालकांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे
राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालकांना महाराष्ट्र एसटी महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी. पं.स.आणि जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालकांना नियुक्ती देण्यासाठी राज्य मंडळाने मंजुरी दिली असून त्याचा शासन निर्णयकडून त्यांना महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी. सर्व संगणक परिचालक यांचे मानधन 14 वित्त आयोगातून न देता राज्य शासनाच्या निधीतून प्रतिमहिना किमान वेतन 15 हजार रुपये द्यावे, सर्व संगणक परिचालक आमचे मागील एप्रिल 2017 ते जुलै 2019 पर्यंतचे सर्व थकीत मानधन द्यावे, ग्रामपंचायतीने आपले सरकार प्रकल्पासाठी निधी दिला नाही. येथील संगणक परिचालकांना एप्रिल 2017 ते जुलै 2019 पर्यंतच्या सर्व मानधन शासनाने आश्वासन दिल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून करणे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान शेतकरी कर्जमाफी योजनेचे मानधन द्यावे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ऑनलाइन सर्वे केलेले मानधन मिळणे. नोटीस न देता कामावरून कमी केलेल्या संगणक परिचालकांना कामावर परत घेणे, मुख्यमंत्री यांनी 30 नोव्हेंबर 2018 रोजी दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील सर्व संगणक परिचालकांना महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी सामावून घ्यावे व राज्याचा निधीतून किमान वेतन प्रति महिना 15000/- रुपये देऊन त्यांच्या सोबत सर्वमागण्या मान्य करून डिजिटल महाराष्ट्र साकारणाऱ्या राज्यातील हजारो संगणक परिचालकांना न्याय द्यावा, जोपर्यंत शासनाच्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत बेमुदत आंदोलन मागे घेणार येणार नाही.
त्याचाच एक भाग म्हणून यावल पं.स.समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे. शासनाने या आंदोलनाची दखल घ्यावी, अन्यथा यापुढे वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करण्यात येतील, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी संजय तायडे अध्यक्ष, सचिव सुधाकर कोळी, सदस्य प्रभाकर तायडे, पंकज पाटील, विक्रम पाटील, हर्षल सोनवणे, रोनक कडवी, मोहिद्दीन तडवी, रवींद्र नावी, राजेंद्र संकोपाळ,
प्रवीण तरडे, सुजाता डाके, कविता पाटील, पुनम धनगर, दीपमाला पारदे, संजीवनी सफाळे, डिगंबर पाटील व इतर सर्व यावल तालुक्यातील संगणक ऑपरेटर उपस्थित होते.