यावल प्रतिनिधी । ई-फेरफार, ई-चावडी व ई-पीकपाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक यांनी राज्य तलाठी संघाच्या पदाधिकाऱ्याला अर्वाच्य भाषा वापरल्याच्या निषेधार्थ आज यावल तालुका तलाठी संघातर्फे तहसीलसमोर एक दिवसीय निदर्शने करण्यात आली असून मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, ई-फेरफार, ई-चावडी व ई-पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी तलाठी संघटना पदाधिकारी यांच्याबद्दल अर्वाच्च व आक्षेपार्ह विधान केले. जगताप यांनी केलेल्या विधानाबद्दल तलाठी महासंघाने निषेध व्यक्त केला. असून त्यांची तातडीने बदली करण्यात आली. दोन दिवसात बदली न झाल्यास १३ ऑक्टोबर पासून लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याच्या निषेधार्थ आज सोमवार ११ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी तलाठी महासंघाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज यावल तालुका तलाठी संघातर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या निवेदनावर यावल तालुका तलाठी संघाचे तालुकाध्यक्ष दीपक गवळी, उपाध्यक्ष समीर तडवी, सचिव टी.सी. बारेला, जिल्हा प्रतिनिधी ईश्वरलाल कोळ, एम.ई. तायडे, शरद सूर्यवंशी, विलास नागरे, निखिल मिसाळ, अजय महाजन, यु. यु. बाबुळकर, अतुल बडगुजर, सुभाष सूर्यवंशी, संदीप गोसावी, के. के. तायडे, मधुराज पाटील, वसीम तडवी, राजू बोराटे, श्री झांबरे, तेजस पाटील, भरत वानखेडे, निलेश धांडे, मारोडे आप्पा, बबीता चौधरी, हेमांगी वाघ, हेमा सांगडे, कीर्ती कदम, सुचिता देशभ्रतार यांच्यासह आदी तलाठी उपस्थित होते.