जळगाव, प्रतिनिधी | बहुचर्चित व वादग्रस्त नागरिकत्व कायद्या दुरुस्ती विधेयक केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने ते विधेयक संसदेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजप सरकार आपल्या संख्याबळाच्या आधारावर तो लोकसभा व राज्यसभेत सुद्धा मंजूर करून घेऊ शकते असल्याने नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक व एनआरसी कायदा त्वरित रद्द करा अशी मागणी जळगाव जिल्हा मुस्लिम मंचतर्फे राष्ट्रपती व पंतप्रधान यांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली.
सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुस्लिम मंचचे कॉर्डिनेटर फारुक शेख यांनी नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर जमियत उलमाचे रागिब जहागीरदार, शिवसेनेचे नगरसेवक इब्राहिम पटेल, एमआयआमचे नगरसेवक रियाज बागवान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमजद पठाण ,मनसेचे जमील देशपांडे, राष्ट्रवादीचे रवींद्र भैय्या पाटील, रिपब्लिकन पक्षाचे मुकुंद सपकाळे, प्रा. शेखर सोनाळकर, इकराचे अध्यक्ष करीम सालार, राष्ट्रवादीचे गफ्फार मलिक आदींनी सुद्धा आंदोलकाना मार्गदर्शन केले. आंदोलनामध्ये मुस्लिम समाजातील सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व सभासद यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्याचप्रमाणे हिंदू बांधवांनी सुद्धा यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.यात प्रामुख्याने साहस फाउंडेशनच्या सरिता माळी व कोमल पवार, सिंधी पंचायतचे जवाहर लालवाणी, मुकुंद सपकाळे,रवींद्र भैया पाटिल, सह मुम्बई शेख फाउंडेशन चे जावेद शेख, कुल जमातीचे सय्यद चाँद, रउफ खान यांची उपस्थिती होती. यांच्यासह डॉ. जावेद, सुन्नी जमातीचे इक्बाल वजीर व शेख शरीफ, काँग्रेसचे बाबा देशमुख, जमील शेख, नदीम काझी ,एमआय एमचे रियाज बागवान युसूफ हाजी, मुलतानी बिरादरीचे नजीर मुलतानी व फिरोज मुलतानी डॉ. रिजवान खाटीक, एॅड. आमिर शेख, अकील खाटीक उपस्थित होते. तसेच शिवसेनेचे रईस शेख, भाजपचे असद हाफिज, इदगाह ट्रस्टचे अनिस शाह, अशपाक बागवान,एम्सचे उमर शेख, खालील शेख, वहिदत इस्लामीचे अतीक शेख, समाजवादी पक्षाचे रईस बागवान, उपस्थित होते. तसेच शाह बिरादरीचे जाहिद शाह, मन्यार बिरादरीचे ताहेर शेख, मीज़ानचे कासिम उमर, कादरिया फाऊंडेशन फारूक कादरी, हॉकर्सचे फारूक अहेलेकार, बामसेफचे फहीम पटेल, अमनचे शाहिद सय्यद, इंडिया रेडीटर चे सलिम शेख, एंग्लोचे मुकीम शेख, अमीन बादलिवाला, वसीम बापू, नूरा मुल्तानी, मिल्लतचे मुश्ताक मिर्ज़ा, मज़हर खान, एनोद्दीन शेख, इक़बाल शेख, हसन शेख, अय्यूब शाह जनाब, रज्जाक, जन नायकचे फिरोज पिंजारी, फ़रीद खान, मौलाना एजाज, आदींची उपस्थिती होती.धरणे आंदोलनाची सांगता उन्नाव येथील पीडित जिला आरोपींनी जाळले होते तिला मृत्यू आल्याने उपस्थितांनी तीला श्रद्धांजली वाहिली. धरणे आंदोलन दरम्यान देण्यात येणाऱ्या घोषणा भाजप सरकारचा धिक्कार असो, सिटीझन अमेंडमेंट बिल व एनआरसी रद्द करा, उत्तर प्रदेश योगी सरकारचा धिक्कार असो, अशा विविध घोषणा अधून मधून देण्यात येत होत्या. जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.