पाचोरा-भडगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायत कार्यालयांना बांधकामसाठी १ कोटीचा निधी मंजूर

kishor patil

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा-भडगाव तालुक्यातील गावांना ग्रामपंचायत कार्यालय निर्माणासाठी १ कोटी निधी मंजूर झाल्याची माहिती नुकतीच आमदार किशोरआप्पा पाटील यांनी दिली आहे. आ.पाटील यांनी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे प्रस्ताव दाखल करून वारंवार पाठपुरावा करुन निधी खेचून आणला आहे.

 

आमदार किशोरअप्पा पाटील यांनी राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्या दालनात वारंवार बैठका घेऊन ग्रामपंचायत कार्यालय निर्माण होतो किती गरजेचे आहे, याचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यानुसार ना.भुसे यांनी तातडीने लक्ष घालून बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत पाचोरा-भडगाव तालुकयातील ८ गावांना प्रत्येकी (12.5 लक्ष) निधी मंजूर केला.

 

दरम्यान, दिघी ता.पाचोरा, लासुरे ता.पाचोरा, घुसर्डी खु ता.भडगाव , सावदे ता.भडगाव , नालबंदी ता.भडगाव, बांबरुड बु.प्र.ता.भडगाव, पिंप्रीहाट ता.भडगाव, भोरटेक बु ता.भडगाव आदी गावांना ग्रामपंचायत कार्यालय निर्माणचे मंजुरीचे पत्र आले असून त्याची शासकीय मान्यता देखील प्राप्त झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कार्यालय नसल्यामुळे कार्यालयातील कामकाजाचा खोळबा होत होता. नागरिकांचे खूप हाल होत होते. कार्यालय निर्माण होत असल्यामुळे सर्व प्रस्ताव वेळेवर सोडविल्यास जाणार असून गावाची प्रगती हॊऊन गावाच्या सौंदर्यात देखील भर पडणार आहे. म्हणून वरील सर्व गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आमदार किशोरआप्पा पाटील यांचे अभिनंदन करीत आभार व्यक्त केले आहेत.

Add Comment

Protected Content