भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील गुढे ते कोळगाव रोडवर वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरवर महसूल विभागाने पहाटे कारवाई केली. यात एकाला ताब्यात घेतले परंतू कारवाई करत असांना सोबत असलेल्या दुसऱ्याने वाळूने भरलेले ट्रक्टर घेवून पसार झाला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील गुढे ते कोळगाव रस्त्यावर वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार महसुल पथकातील कोतवाल राजेंद्र तुकाराम थोरात (वय-४५) रा. कोळगाव ता. भडगाव यांनी ९ डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता कारवाई करत संशयित आरोपी दादु उर्फ कैलास पाटील याला ताब्यात घेतले. महसूल विभागाने कारवाई केल्याचे पाहून दुसरा संशयित आरोपी कैलास भावराव पाटील रा. वाक ता. भडगाव हा ट्रक्टर घेवून पसार झाला. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांवर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक निलेश ब्राम्हणकर करीत आहे.