जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रेल्वे स्टेशनच्याजवळ असलेल्या खान्देश सेट्रल मॉल परिसरातून प्रकाश अंशीलाल मंधान (वय ४४, रा. सिंधी कॉलनी) यांची दुचाकी लंपास केल्याची घटना सोमवारी २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी २७ डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील समाधा आश्रमजवळ प्रकाश अंशीलाल मंधान हे वास्तव्यास आहे. सोमवारी २५ डिसेंबर रोजी त्यांच्या (एमएच १९ सीए ४२४५) क्रमांकाच्या दुचाकीने जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात आले होते. त्यांनी दुचाकी खान्देश सेंट्रल मॉल रोडपरिसरात लावून ते कामानिमित्त निघून गेले. याचवेळी चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरुन नेली. हा प्रकार सायंकाळी ७ वाजता उघडकीला आला. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर बुधवारी २७ डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्सटेबल किशोर निकुंभ हे करीत आहे.