जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जवखेडा येथील तरूणाला शिवीगाळ करू नको असे सांगितल्याच्या कारणावरून एकाला काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील जवखेडा येथील रहिवाशी राजेंद्र केवलसिंग पाटील (वय-४३) हे शुक्रवारी रात्री घरात झोपले असता त्यांच्या घरासमोर सोनू गोपाळ हा मोठमोठयाने शिवीगाळ करत होता. राजेंद्र पाटील हे घराबाहेर आले, त्यंनी सोनू यास शिवीगाळ का करतोय, कुणाला करतोय, या जाब विचारला व शिवीगाळ करु नको तसेच घराजवळून निघून जा असे सांगितले त्याचा राग आल्याने सोनू गोपाळ याने राजेंद्र पाटील यांच्या डोक्यात लाकडी काठीने मारहाण करण्यात सुरुवात केली. गावातील इतरांनी पाटील यांना गोपाळ याच्या तावडीतून सोडविले. मारहाणीत राजेंद्र पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. जखमी राजेंद्र पाटील यांच्या जबाबावरुन सोनू गोपाळ याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.