जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील धानवड येथे दारूच्या नशेत असणाऱ्या व्यक्तीला मस्करी न करण्याच्या कारणावरून एकाला तीन जणांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, धनराज तुकाराम जोगी रा. धानवड ता.जि.जळगाव हे आपल्या पत्नीसह वास्तव्याला आहे. त्यांच्या गल्लीत राहणारा भागवत दगा जोगी हा १३ जुलै रोजी दुपारी १ वाजता दारू पिऊन घरी आला. त्यावेळी धनराज जोगी यांच्या पत्नीशी मस्करी करू लागला. दरम्यान धनराज जोगी व त्यांची पत्नी यांनी मस्करी न करण्याचे सांगितल्याचा राग भागवत जोगी याला राग आल्याने त्यांच्यासह त्याचे दोन्ही मुले छोटू भागवत जोगी आणि गणेश भागवत जोगी यांनी पती पत्नीस लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी धनराज जोगी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गफार तडवी करीत आहे.