शिरसोली येथे किरकोळ कारणावरून चौघांकडून एकाला बेदम मारहाण; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथे घराच्या भिंत बांधण्याच्या कारणावरून मुलासह आईला शेजारी राहणाऱ्या चार जणांना बेदम मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी १२.३० घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथील रहिवाशी दशरत रामदास ताडे (वय-४०) हे मिस्तरी काम करतात. घराच्या भिंतीचे बांधकाम करण्यावरून त्यांच्या घराच्या शेजारी राहणारे भागवत देवरात ताडे यांनी शिवीगाळ करून दशरथ ताडे आणि त्यांच्या आईला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच संशयित आरोपी भागवत ताडे यांच्या घरातील कुटुंबिय निलेश मधुकर ताडे, दिपक मधुकर ताडे आणि सुधिर भागवत ताडे सर्व रा. शिरसोली यांनीदेखील दशरथ ताडे यांना मारहाण केली. तसचे भागवत ताडे यांनी दशरथ यांच्या डोक्याला लाकडी काठी मारून गंभीर दुखापत केली. तसेच शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. यात भागवत यांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होता. उपचार घेतल्यानंतर दशरथ ताडे यांच्या फिर्यादीवरून भागवत ताडे, निलेश ताडे, दिपक ताडे आणि सुधिर ताडे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रकाश पवार हे करीत आहे.

 

 

Protected Content