रावेर प्रतिनिधी । उस तोडीचे उर्वरित पैसे मागण्याच्या कारणावरुन तिघांनी मिळून एकास गंभीर जखमी केले आहे. तसेच जखमी मुलाच्या आई-वडील यांना देखील जखमी केले आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १)नवल खुमसिंग बारेला, २)इरफान सुपडू तड़वी, 3)मजीत सुपडू तड़वी (सर्व रा. निमडया ता. रावेर) असे आरोपींचे नावे असून तिघांना अटक करण्यात आली आहे. नवल बारेला याचेकडून सुनील बारेला याने वडिलांचे उस तोडिचे उर्वरित पैसे मागितले, तर या गोष्टीचा राग आलेचे कारणावरुन मजीत तड़वी याने डोक्यावर दगड मारून गंभीर दुखापत केली. सुनील बारेला याच्या वडिलांना डावे हातावर इरफान तड़वी काठी मारून हात फैक्चर करून दुखापत केली. तर नवल बारेला यांने सुनीलच्या आईला धक्का मारून जमिनीवर पाडले व शिविगाळ करून दमदाटी केली.
हा सर्व प्रकार तालुक्यातील निमड्या गावातील गोविंदा गेंदया बारेला यांच्या घराजवळ आज (दि.१६ मे) रोजी सकाळी ११ : ३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रावेर पो.स्टे.गु.र.न. 156/2021 भा.द.वी.कलम – 326,325,324,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनानुसार पुढील तपास पो.हे.का/ 2578 राजेंद्र राठोड,पो ना अतुल तडवी,पो कॉ नरेंद्र बाविस्कर,पो कॉ संदीप धनगर,पो कॉ ठाकूर हे करीत आहेत.