गावठी बनावटीच्या कट्ट्यासह एकाला अटक; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एका संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी सोमवारी ५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा जप्त करण्यात आला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात एक तरूण गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पथकाने सोमवारी ५ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे, नितीन ठाकूर, विशाल कोळी पथकाने कारवाई करत संशयित आरोपी चेतन वसंता देवुळकार (वय २२ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. कुसुंबा, जळगाव) याला अटक केली. त्यांच्या राहत्या घरातून गावठी बनावटीचा कट्टा पोलीसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठज्ञण्यात संशयित आरोपी चेतन देवुळकार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश घुगे करत आहेत.

Protected Content