Home क्राईम महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

0
34
90908765 stock vector black and white illustration of a hand covering woman mouth concept for abuse or domestic violence
90908765 stock vector black and white illustration of a hand covering woman mouth concept for abuse or domestic violence

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील वरसाडा तांडा येथे आदिवासी महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील 28 वर्षीय विवाहित आपल्या कुटुंबीयांसह राहते. 28 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता विवाहिता घरात एकटी असताना गावातील विकास वाल्मिक बडगुजर राहणार वरसाडा तांडा ता. पाचोरा अनधिकृतपणे घरात घुसून विवाहितेसी अंगलट करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी विवाहितेचा फिर्यादीवरून विकास बडगुजर यांच्यावर पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भरत काकडे करीत आहे.

 


Protected Content

Play sound