Home Cities जळगाव मराठी भाषा दिनानिमित्त ‘उमवि’त बुधवारी कार्यक्रम

मराठी भाषा दिनानिमित्त ‘उमवि’त बुधवारी कार्यक्रम


MARATHI BHASHA DIVAS 696x447

जळगाव (प्रतिनिधी) येथील बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे उद्या (दि.२७) ‘मराठी भाषा दिवस’ साजरा केला जाणार असून त्या अंतर्गत दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी १०.३० वाजता विद्यापीठातील अधिसभा सभागृहात ग्रंथ प्रदर्शन, त्यानंतर ११.०० वाजता त्याच ठिकाणी कवी विष्णू थोरे यांचे ‘मराठ मोळं आमचं गाणं, लाख मोलाचं सोनं’ या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी ४.०० वाजता भाऊंच्या उद्यानापासून ते संभाजी नाट्य मंदिरापर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात येईल. तर सायंकाळी ५.०० वाजता नाट्यगृहात युवारंग महोत्सवातील विद्यार्थी-कलावंतांचा सांकृतिक कार्यक्रम होईल. अशाप्रकारे दिवसभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound