मुंबई वृत्तसंस्था । आठड्यातील तिसऱ्या दिवशीदेखील रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरला चांगला भाव मिळाला. दिवसअखेर रिलायन्सच्या शेअर भावात २.५३ टक्क्यांनी वाढ होऊन तो १ हजार ५४८ रुपये असा दर होता. रिलायन्सला आतापर्यंत मिळालेला, हा सर्वोत्तम शेअर दर आहे.
आज दिवस अखेरीस सेन्सेक्स १८१ अंकांनी वधारले, ४० हजार ६५१.६४ अंकावर बंद झाला. तर, निफ्टी ५९ अंकांनी वधारत ११ हजार ९९९ अंकावर बंद झाला. या तेजीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीचे बाजार भांडवल ९,९०,३६६.८० कोटी रुपयांपर्यंत पोहचला. कोणत्याही लिस्टेड कंपनीचे भांडवल इतक्या रक्कमेवर पहिल्यांदा पोहचले. रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर टीसीएस आणि एचडीएफसी बँकेचा क्रमांक येतो. मात्र, या दोन्ही कंपनींनी बाजार भांडवलाचा ९ लाख कोटींचा टप्पा गाठला नाही. बाजार सुरू होताच येस बँकेचा शेअर दरात वाढ झाली. बाजार बंद होईपर्यंत येस बँकेच्या शेअर दरात २.६५ टक्के वाढ होऊन ६५.८५ अंकांवर बंद झाला.