जळगाव प्रतिनिधी | केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्रातर्फे गुरुवारी कारगील विजय दिनानिमित्त रेल्वे स्थानक परिसर आणि रेल्वे पोलीस ठाणे परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
देशभर यावर्षी ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्रातर्फे विजय दिनानिमित्त रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नेहरु युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविण्यात आला. स्वच्छता मोहिमेच्या उदघाटनप्रसंगी रेल्वे पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
रेल्वे स्थानक परिसर, रेल्वे पोलीस दूरक्षेत्र स्थानक परिसराची नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी साफसफाई केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. स्वच्छता अभियानासाठी नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेविका हेतल पाटील, कोमल महाजन, हर्षल चौधरी, गौरी बारी, तुषार चौधरी, भूषण अंबीकर, मयूर चौधरी, चेतन वाणी, सचिन महाजन, अविनाश कोळी, अक्षद बेंद्रे, मोहित पाटील, दीपक महाजन आदींनी परिश्रम घेतले.