जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आर.आर. विद्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सर्प जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
जळगाव शहरातील आर.आर विद्यालयात वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनीवार १९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता सर्प जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी सर्प विज्ञान समन्वय सप्ताह या माध्यमातून सापांचे ओळख, सापांपासून बचाव कसा करायचा, सापांच्या अस्तित्वाच्या सूचना आणि प्रथमोपचार, साप चावल्यानंतर काय करावे. याविषयी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जगदीश बैरागी यांनी दिले.
तसेच सर्पमित्र गोकुळ पाटील यांनी प्रथमोपचार बद्दल माहिती दिली. वन्यजीव संरक्षण संस्था संस्थेच्या कार्य विस्ताराचा, संस्थेचा विविध क्षेत्रांमध्ये कार्य, वेगवेगळ्या जिल्ह्यामधील कार्य या विषयी माहिती दिली. त्यानंतर मेहरूण येथील जयदुर्गा माध्यमिक विद्यालयात शहर महानगरपालिका उर्दू शाळा, भगीरथ शाळेतही सापांची माहिती देवून मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष रविंद्र फालक, संस्थापक बाळकृष्ण देवरे, सचिव योगेश गालफाडे, शून्य सर्पदंश जनजागृतीचे राजेश सोनवणे, शुन्य सर्पदंश अभियानाचे समन्वयक जगदीश बैरागी यांनी परिश्रम घेतले.