गणेशोत्सवानिमित्त मंगेश चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमांची मेजवानी

mangesh chavan

चाळीसगाव (प्रतिनिधी) गणरायाच्या उत्सव हा भारतीय संस्कृतीतील सर्वोच्च उत्सवांमध्ये गणला जातो. या गणरायांच्या उत्सवासाठी चाळीसगाव नगरी सज्ज असून मंगेश चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने चाळीसगावकरांना विविध कार्यक्रमांची मेजवानी देण्यात आलेली आहे. सिताराम पहिला मळा चाळीसगाव येथे रोज संध्याकाळी ८ वाजता विविध विषयांवर कार्यक्रम होणार आहेत.

समाजाचे मनगट व मेंदू सशक्त करण्यासाठी या उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार दिनांक 3 सप्टेंबरला रांगोळी स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्याला 11000 व द्वितीय आलेल्याला 5000 रुपये एवढे भरघोस बक्षीस दिले जाणार आहे. रांगोळी स्पर्धेसाठी शांताराम पाटील व भाग्यश्री मॅडम यांच्याशी संपर्क करण्याचे आव्हान केले आहे.

4 सप्टेंबर रोजी युवा व्याख्याते माननीय अविनाश भारती यांचे आई-वडील व आजची तरुणाई या विषयावर तरुणांना खाडकन जागे करणारे व आई-वडिलां प्रती कृतज्ञता व्यक्त करणारे व्याख्यान होणार आहे. दिनांक 5 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध हेअर स्टाइलिश श्री जावेद हबीब यांची प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे त्यासाठी अभय वाघ व भाग्यश्री मॅडम यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहण केले आहे.

दिनांक 6  सप्टेंबर रोजी गरबा वर्कशॉप व गरबा स्पर्धा आयोजित केलेला असून या गरबा स्पर्धेतही प्रथम बक्षीस 11000 व द्वितीय बक्षीस 5000 असे ठेवण्यात आलेले आहे. यासाठी भावेश कोठावदे व भाग्यश्री मॅडम यांशी संपर्क करण्याचे सांगितले आहे. दिनांक 7 सप्टेंबर रोजी डोंगर हिरवागार फेम , डोंगर हिरवा गार गृप शिरपुर तर्फे कानुबाई गीतांचा कार्यक्रम पार पडणार आहे.

दिनांक 8 सप्टेंबर रोजी हभप पुरुषोत्तम पाटील महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक 9 सप्टेंबर रोजी हुनर ही नृत्याची स्पर्धा होणार असून या नृत्याच्या स्पर्धेसाठी ही प्रथम बक्षीस 11000 व द्वितीय बक्षीस 5000 ठेवण्यात आलेले आहे.यासाठी प्रवीण मराठे व ललित महाजन यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

 

दिनांक 10 व 11 सप्टेंबर रोजी श्री साई गोपाल देशमुख यांचा साई कथांवर आधारित कार्यक्रम होणार आहे.तसेच 11 तारखेला सत्यनारायण व महाप्रसादाचा कार्यक्रम दुपारी 2 वाजता ठेवला आहे. दिनांक 12 सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक होणार आहे.

 

विविध भरगच्च कार्यक्रम गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेले आहेत. तसेच या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सिताराम पहिलवान मळा याठिकाणीच भव्य 35 फूट शिवलिंगाची स्फूर्तिदायी शिल्प साकारण्यात आले आहे. गड किल्ले प्रदर्शन,शिवकालीन शस्त्र प्रदर्शन,  स्थानिक कलाकारांचे चित्रप्रदर्शन व अनोखे आकर्षण म्हणून प्रभाकर सिंग यांचे कल्चरल प्रदर्शन अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी चाळीसगावकरांना अनुभवायला मिळणार आहे. तरी याचा लाभ घेण्याची व स्पर्धांमध्येही सहभागी होण्याचे आवाहन मंगेश चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आलेली आहे. मंगेश चव्हाण मित्र परिवारच्यावतीने चाळीसगावमध्ये नेमीच विविध सामाजिक उपक्रम घेतल असते. तसेच सामाजिक कामाच्या माध्यमातून समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न सुरुच असतो.

Protected Content