वडिलांच्या अमृतमहोत्सवानिमित्त डॉ. बडगुजर यांचा मोफत रूग्णसेवेचा स्तुत्य उपक्रम

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । समाजाचे आपण एक देणे लागतो या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन  दर महिन्याच्या एक तारखेला मोफत रूग्णसेवा करणार असल्याची घोषणा जिजाई हॉस्पिटल चे संचालक डॉ. रवींद्र बडगुजर यांनी केली ते वडिलांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते .

 

पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित आर. टी. लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंतराव बडगुजर यांच्या अमृत महोत्सवाचे आज आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी गणपती पूजन करण्यात आले. प्रास्ताविक रामचंद्र वानखेडे यांनी केले. याप्रसंगी त्यांचे सहकारी एस. एस. गावंडे, अशोक खांजोडकर, माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे, राजेंद्र बडगुजर यांनी मनोगत असून सदिच्छा व्यक्त केल्या.

 

याप्रसंगी वाय.एस. पाटील, आर.के. पाटील, सुधाकर बोरसे, मधुकर बोरसे, व्ही.जी. भालेराव, मुख्याध्यापक आर.बी. पाटील, एस. व्ही. पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, आप्तजन, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राजेंद्र बडगुजर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पहूर ते पुणे ( पीटूपी  प्रोग्रॅम ) योजनेद्वारे पहूर व परिसरातील सुशिक्षित बेरोजगार व होतकरू तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला. यामुळे  गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी मित्र परिवाराने सहकार्य केले. सुत्रसंचालन शंकर भामेरे यांनी केले. डॉ. रवींद्र बडगुजर यांनी आभार मानले.

 

Protected Content