भाजपतर्फे आ. राजूमामा भोळे गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

rajumama bhole

जळगाव प्रतिनिधी । भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे हे गुरूवार 3 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तत्पुर्वी शहरातून जोरदार शक्तीप्रदर्शन होणार असून मिरवणूकी काढण्यात येणार आहे.

शहरातील शिवाजी पुतळ्यापासून ते तहसिल कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांसह व जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, ना. हरिभाऊ जावळे, ना. गुरुमुख जगवानी, ना. उज्वलाताई पाटील, खा. रक्षा खडसे, खा. उन्मेष पाटील, आ. स्मिता वाघ, आ. चंदू पटेल, संघटन मंत्री अॅड. किशोर काळकर, डॉ. राजेंद्र फडके, महापौर सीमाताई भोळे, उप महापौर डॉ. अश्विन सोनवणे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, आर.पी.आय महानगर प्रमुख अनिल अडकमोल, रासप शिवसंग्राम व रयत क्रांती तसेच स्थायी सभापती जितेंद्र मराठे, महिला सभापती मंगला चौधरी, सभागृह नेते ललित कोल्हे, शिवसेना विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, नितीन लढ्ढा, उप गटनेते राजेंद्र घुगे पाटील, विष्णू भंगाळे, दीपक सपकाळे या प्रमुख मान्यवरांच्या व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

उपस्थित राहण्याचे आवाहन
यावेळी भाजपा शिवसेना महायुतीच्या सर्व पदाधिकारी, जिल्हा पादाधिकारी, मंडळाध्यक्ष, विविध आघाड्यांचे अध्यक्ष, सर्व नगरसेवक, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच भाजपा पक्षावर व राजू मामा यांच्या स्नेही मित्र परिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, सरचिटणीस दीपक सूर्यवंशी, पाटील, महेश जोशी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर, महेश ठाकूर, मनोहर चौधरी, संजय शिंदे यांनी केले आहे.

Protected Content