यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माझे वडील सुधाकर फेगडे यांनी ३२ वर्ष शिक्षक सेवा केलेले सेवानिवृत्त शिक्षक असुन त्यांच्या शिक्षण कार्यकाळात मी त्यांचा विद्यार्थी असल्यामुळेच माझ्या जिवनास आकार मिळाले असुन, माझ्या मनात शिक्षक व शिक्षण क्षेत्राबद्दल अपार श्रद्धा असल्याचे वडिलांनी विद्यार्थ्यांसाठी केलेली धडपड मी प्रत्यक्षात अनुभवली आहे. आश्रय फाउंडेशन या समाजसेवी व समाजहिताचे कार्य करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातुन विविध समाजघटकांशी सुसंवाद होत असतांना शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातुन विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा यथोचित सन्मान व्हावा या करीता गुरुजनांसाठीचा हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आल्याचे प्रतिपादन आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ कुंदन फेगडे यांनी फैजपुर येथील खंडोबावाडी सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले .
फैजपुर येथे संपन्न झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने संपन्न झालेल्या या सन्मान सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासनाचे राज्यस्तरिय पुरस्कार प्राप्त शिक्षक दिलीप पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन खंडोबावाडी देवस्थान चे गादीपती पवनदासजी महाराज, राज्यशासनाचे राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षीका अश्वीनि कोळी, जितेन्द्र पाटील,दिपक चव्हाण,पी एस सोनवणे, सेवानिवृत्त शिक्षक सुधाकर फेगडे यांनी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली, कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ कुंदन फेगडे यांनी केले, तर अतिश्य सुंदर असे सुत्रसंचालन गिरीष्मा कोळी या विद्यार्थीनीने केले. या सन्मान सोहळ्यात यावल व रावेर या तालुक्यातील ९६ शिक्षकांचा प्रशस्तीपत्र देवुन सन्मानीत करण्यात आले .याप्रसंगी खंडोबा महाराज देवस्थानाचे गादीपती पवनदासजी महाराज,दिपक पाटील,पी एस सोनवणे मोठया संख्येत शिक्षक उपस्थित होते .