जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कोर्ट चौकात आज दुपारी एका ओमनीने अचानक पेट घेतल्यामुळे प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले होते.
या संदर्भात अधिक असे की, आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास कोर्ट चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ ओमनी क्रमांक (एमएच-२०, एवाय ११८७) या गाडीने अचानक पेट घेतला. ड्रायव्हर सीट खाली आगीला सुरुवात होताच सुदैवाने चालकाच्या लक्षात ही गोष्ट तात्काळ लक्षात आली. त्यामुळे त्याने गाडी बाहेर पळ काढला. त्यानंतर अगदी काही क्षणातच ओमनी मोठा पेट घेईल तेवढ्यात अग्नीशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे आग थोडक्यातच विझली. कोर्ट चौक हा नेहमी गजबजलेला असतो. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.