जळगाव प्रतिनिधी । ब्रह्माकुमारीज् जळगावद्वारा आयोजित ‘शिवशक्ति दर्शन आध्यात्मिक मेला’चे भव्य उद्घाटन आज घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी संपन्न झाले. चाळीसफुट उंच असलेल्या या भव्य चैतन्य आरास पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे यंदा प्रथमच जळगाव शहरवासीयांसाठी नवदुर्गा महोत्सवात चाळीस फुटी नवदुर्गा आरासचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात मातेचे नऊ रूपांची महती आणि वरदानांचे लाईट आणि साऊंडचे संुदर मिश्रणाद्वारे आध्यात्मिक रहस्य स्पष्ट करण्यात आलेले आहे.
महोत्सवाचे उद्घाटन
नवदुर्गा महोत्सवाचे उद्घाटन शहरातील आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक, राजकिय, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य आणि इतर वर्गातील मान्यवरांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आले. त्यात ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी उपक्षेत्रीय निदेशिका, दलुभाऊ जैन समाजसेवक संघपती, डॉ. गुरुमुख जगवाणी मंत्री, डॉ. उल्हास पाटील माजी खासदार, मिलींद दीक्षित जिल्हा क्रीडा अधिकारी, प्रभूदेसाई व्यवस्थापक सुप्रीम इंडस्टीज, अॅड. पंढरीनाथ चौधरी अध्यक्ष बार कॉन्सिल जळगाव, मोतीलाल लोहार जळगाव जनता सह. बँक, डॉ. किरण पाटील संचालक शिवम डायग्नेस्टिक, प्रा. रवी पाटील जळगाव, मंजुषा भिडे हॉलीबॉल पटु, सीए परिक्षीत भदादे चार्टड अकाऊंट, रवी पाटील ओम इंडस्ट्रीज, वाघळुद, डॉ. अनिल सांळुंखे, चाळीसगांव, ब्र.कु. ओंकार भाई माऊंट आबू, शांताराम पाटील ज्येष्ठ राजयोगी, जळगाव व इतर मान्यवरांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ब्र.कु. हेमलता दीदी यांनी केले.
दसरा पर्यंत आयोजन
ब्रह्माकुमारीज् शिवशक्ति नवदुर्गा महोत्सवाचे आयोजन 8 ऑक्टोंबर दसरापर्यंत संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत चालणार आहे. यात दररोज नाविण्यपूर्ण आध्यात्मिक रहस्य स्पष्टीकरण करण्यात येऊन मातेची आरती व भाविकांना आध्यात्मिक रहस्याचे स्पष्टीकरण करण्यात येणार आहे. खानदेश मिल बीग बाजारा जवळील भव्य मैदानात सदरहू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी विशेष 12 टन लोखंडाचा भव्य सांगाडा या ठिकाणी उभारण्यात येत असून श्ंभर फुट परीक्षक्षेत्र हे त्याचे क्षेत्रफळ आहे. दररोज 30 सेवेकरी अहारोत्र आपली सेवा देत आहेत. या भव्य आरासची निर्मिती विशेष कलकत्याहून आलेले मुखर्जी भाई यांच्या मुख्य समन्वयनातून प्रस्तुत आरास साकारण्यात येत आहे.
प्रकाश योजना आणि आवाजाचे दमदार सादरीकरण
या महोत्सावाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे चाळीसफुट उंचावर प्रत्येक मातेची चैतन्य आरासाद्वारे दर्शन तर होतेच परंतु सुंदर प्रकाशयोजना आणि दमदार आवाजाद्वारे भाविकांना आध्यात्मिक रहस्य स्पष्ट होते. यासाठी भाविकांचा पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त सहभाग लाभल्याचे आयोजकांनी सांगितले.