चोपडा (प्रतिनिधी) येथील ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी ओम रामलाल जैन हा सीबीएस्सी बोर्ड परीक्षेत ९६.८% गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
ओम रामलाल जैन हा येथील कॉलेज रोडवरील ओम झेरॉक्स आणि जनरल स्टोअर्सचे संचालक रामलाल चंपालाल जैन यांचा चिरंजीव आहे. त्याच्या या यशात त्यांची आई अर्चना जैन तर प्रा.प्रविण पाटील, सारिका बाविस्कर,रेखा पाटील,उज्वला भट,जितेंद्र सोनार यांचे सहकार्य लाभले. त्याचे या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन ऍड संदीपभैय्या पाटील, सचिव डॉ स्मिता पाटील, जैन समाजाचे संघपती गुलाबचंद देसरडा, सोहनराज टाटीया तसेच तालुक्यातून अनेकांनी अभिनंदन केले आहे.