Home राजकीय लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला

लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला

om birla
om birla

om birla

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) 17 व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून राजस्थानमधीलखासदार ओम बिर्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

कोटा मतदारसंघातून दुसऱ्यांदा खासदार बनलेल्या ओम बिर्ला यांना लोकसभेच्या अध्यक्षपदाचा बहुमान देण्यात आल्याची माहिती आहे. आज दुपारी बिर्ला अधिकृतपणे लोकसभा अध्यक्षपदाची औपचारिकता पूर्ण करणार असल्याचे कळते. नुकतेच, भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या भेटीसाठी बिर्ला हे त्यांच्या बंगल्यावर गेले आहेत. मात्र, बिर्ला यांच्या पत्नी अमिता यांनी ओम बिर्ला यांच्या निवडीबद्दल अभिमान आणि अत्यानंद असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच, त्याबद्दल संपूर्ण मंत्रिमंडळाचे आभारही मानले आहेत.


Protected Content

Play sound