
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजप खासदार ओम बिर्ला यांची 17 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात बिर्ला यांचे नाव अध्यक्ष पदासाठी सूचवले होते. खासदारांच्या समर्थनानंतर त्यांची अधिकृत निवड झाली.
काँग्रेस, तृणमुल काँग्रेस या विरोधी पक्षांसह इतर सर्वच पक्षांनी यावेळी ओम बिर्ला यांच्या निवडीला पाठींबा दर्शवला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड ही सभागृहासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. मी ओम बिर्ला यांचे अभिनंदन करतो. अनेक खासदार त्यांचे चांगले ओळखतात. त्यांनी यापूर्वी राजस्थान सरकारमध्येही काम केले आहे. दरम्यान, मोदींनी स्वत ओम बिर्ला यांना अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत पोहोचवले. राजस्थानच्या कोटा-बूंदी येथून खासदार असलेले बिर्ला यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.