सोनभद्र (वृत्तसंस्था) वयाची पासष्टी ओलांडलेल्या एका वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.
एक डिसेंबर रोजी हा गुन्हा घडला होता. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला राम किशनला सोनभद्र जिल्ह्यातून अटक केली आहे. तर महिलेवर उपचार सुरु आहेत. भाजपाच्या राजवटीत महिला आणि मुली सुरक्षित नसून उत्तर प्रदेशात दिवसेंदिवस महिलांची स्थिती खराब होत असल्याची टीका समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे समाज मन सुन्न झाले आहे.