अमळनेर (प्रतिनिधी) आज रोजी मुंबई येथे शिक्षक व पदवीधर आमदारांची शिक्षक-कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतच्या महत्वाच्या विषयावर महत्चपूर्ण बैठक विधिमंडळ अध्यक्षांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत विधिमंडळ आणि न्यायालय या दोन्ही आघाड्यांवर लढण्याचा निर्णय एकमताने ठरविण्यात आले. .न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करुन सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी तातडीने जेष्ठ विधिज्ञांशी चर्चा करुन निर्णय घेण्याचे ठरले . यासाठी ना श्रीकांत देशपांडे व आ.ॲड्. राहुल नार्वेकर यांनी जबाबदारी स्विकारली आहे. ये णाऱ्या अधिवेशनात स्थगन प्रस्ताव मांडून शिक्षक-कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचे ठरले. तसेच यासाठी लागणारी सर्व मदत ही सर्व शिक्षक व पदवीधर आमदारांनी करावी असे सर्वांनुमते ठरले आहे. तरी शिक्षक-कर्मचारी बंधुभगिनींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. पेंशन हा हक्क आहे तो कोणीही हिरावू शकत नाही. जुनी पेंशनचा लढा येत्या अधिवेशनात तिव्र केला जाईल. या बैठकीस ना .श्रीकांत देशपांडे , आ.विक्रम काळे, आ.दत्तात्रय सावंत, आ.बाळाराम पाटील, आ.कपिल पाटील, आ.डॉ. सुधीर तांबे, आ.किशोर दराडे, आ.ना.गो.गाणार, आ.प्रा. मनिषा कायंदे, आ.प्रकाश गजभिये व आ. ॲड्. राहुल नार्वेकर हे उपस्थित होते.