ट्रॅक्टरच्या धडकेत वृध्दाचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वार गंभीर जखमी

रावेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील पातोंडी गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला कट मारून झालेल्या अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार ९ जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. चुडामन लहानू भालेराव वय-६० रा. कर्जोत ता. रावेर असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील पातोंडी गावाजवळ रविवार ९ जून रोजी सकाळी १०.३० वाजता अजय अशोक शिरतुरे वय-३० रा. विवरा ता.रावेर हा त्याची दुचाकी एमएच १९ इडी ७५९२ निंभोरा सिमकडे जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत चुडामन लहानू भालेराव हे देखील दुचाकीवर मागे बसलेले होते. दरम्यान भरदा वेगाने येणारे ट्रॅक्टर क्रमांक (एमएच २९ आर ८९०२) ने जोरदार येऊन कट मारला. या अपघातात दुचाकीवरील दोघे खाली पडले. तर या अपघातामध्ये चुडामन भालेराव यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार अजय शिरतुरे हा किरकोळ जखमी झाला असून थोडक्यात बचावला आहे. दरम्यान याप्रकरणी दुपारी ३ वाजता रावेर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार ट्रॅक्टर चालक शेख अलीम शेख सलीम रा. मदिना कॉलनी रावेर याच्या विरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रिया वसावे हे करीत आहे.

Protected Content