भरधाव दुचाकीच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील म्हसले गावातील बसस्थानकाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीच्या धडकेत ६४ वर्षीय वृध्द व्यक्ती यांचा ६४ वर्षीय यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटन ३० जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली होती. याप्रकरणी शनीवारी ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाब तुकाराम पाटील वय-६४ रा. म्हसले ता.अमळनेर असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, गुलाब पाटील हे आपल्या परिवारासह अमळनेर तालुक्यातील म्हसले गावात वास्तव्याला होते. ३० जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता गावातील बसस्थानकाजवळ उभे असताना त्यांना भरधाव वेगाने येणारी दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीटी ६०३६) ने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत वृध्दाचा जागीच मृत्यू झाला.त्यांचा जागी स्मृति झाला. दरम्यान या घटनेबाबत शनिवारी ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता दुचाकी चालक विनोद पुंजू मोरे रा. टाकरखेडा ता. अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहे.

Protected Content