
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री संत ज्ञानेश्वर पांझरापोळ संस्था, चिंचोली यांच्या वतीने ‘माऊली महोत्सव वर्ष’ आणि गोपाष्टमी उत्सवाचे औचित्य साधून गुरुवार, ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता नेरी नाका येथील पांझरापोळ गोशाळेत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते विधिवत गोपूजन करण्यात आले. उत्सवाचा एक भाग म्हणून, मान्यवरांच्या हस्ते गोशाळेतील गाईंना सुमारे ६० किलो लापशीचा महाप्रसाद देण्यात आला. गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला.

आयोजित या गोपाष्टमी उत्सवात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे, हा पांझरापोळ संस्थेचा सलग सहावा गोपाष्टमी उत्सव होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी गोपाष्टमीचे महत्त्व विशद केले आणि गोसंवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
मान्यवरांची उपस्थिती:
या कार्यक्रमाला पांझरापोळ संस्था जळगावचे संचालक दिलीप गांधी, रोटरी क्लब मिडटाऊन जळगावचे अध्यक्ष ॲड. किशोर पाटील, द्वारकामाई फाउंडेशन जळगावचे संस्थापक अध्यक्ष किशोर जगन्नाथ सूर्यवंशी, संस्थापक ह.भ.प. एकनाथ पाटील यांच्यासह जितेंद्र ढाके, मनोज पाटील, सुरेंद्र असावा, राजेंद्र कुलकर्णी, अनिल अग्रवाल, संजय बारी, सुधीर चौधरी आदी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गायींना ६० किलो लापशीचा नैवेद्य:
उत्सवाचा एक भाग म्हणून, मान्यवरांच्या हस्ते गोशाळेतील गाईंना सुमारे ६० किलो लापशीचा महाप्रसाद देण्यात आला. गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला.
श्री संत ज्ञानेश्वर पांझरापोळ संस्था मागील पाच वर्षांपासून हा कार्यक्रम नियमितपणे आयोजित करत असून, या माध्यमातून संस्थेने गोसंवर्धनाचे कार्य प्रभावीपणे समाजात पोहोचवले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. गोपाष्टमी उत्सवामुळे नागरिकांमध्ये गोसंवर्धनाबाबत अधिक जागरूकता निर्माण होण्यास मदत मिळाली.



