शिंदे गटाकडून ५० कोटींची ‘ऑफर’ : शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्यासाठी शिवसेनेच्या फुटीर आमदारांना मोठे आमीष दाखविण्यात आल्याची चर्चा असतांनाच आ. उदयसिंह राजपूत यांनी हा आकडा ५० कोटींचा असल्याचा गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे.

 

एकनाथ शिंदे यांच्या गटाची पंचतारांकीत सरबराई आणि एकाच वेेळेस इतक्या आमदारांनी फुटण्यामागे मोठे अर्थकारण असल्याची चर्चा असतांना आता कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिंदे गटात सामिल होण्यासाठी ५० कोटींहून अधिकची ऑफर दिली असल्याचा दावा राजपूत यांनी केला आहे. याशिवाय दोन चारचाकी वरुन फुटेज असल्याचा दावा आमदार राजपूत यांनी केला आहे. १०० कोटी दिले तरीही सेनेसोबत गद्दारी करणार नाही, असे त्यांनी सांगितले.

या ऑफरसंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, याहून अधिकची ऑफर होती. याबाबत माझ्याकडे दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचे फुटेजही असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.   बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्याबाबत कोणतीही गद्दारी करणार नाही. मला ऑफर होती मात्र मी गद्दारी केली नाही असंही त्यांनी सांगितले.

Protected Content