राष्ट्रीय महामार्गावर भरधाव बुलेटची कारला धडक

बुलेटवरील दोघे जखमी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दारू पिऊन बुलेटवरून जात असलेल्या दोघांनी कारला धडक देवून जखमी झाल्याची घटना खेडी गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी २५ जून रात्री ११ वाजता घडली. याबाबत रविवारी २६ जून रोजी दुपारी एमआयडीसी पोलीसात दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातल जुना खेडी रोड परिसरातील ज्ञानचेतना सोसायटीत रविंद्र प्रल्हादराव टाले हे वास्तव्यास आहे. शनिवार २५ रोजी शनिवारी रात्री ११.१० वाजेच्या सुमारास ते एमआयडीसीतील कार्यालयातून दैनंदिन काम आटोपून त्यांच्या (एमएच २० डीव्ही २६२३) क्रमांकाच्या कारने घरी जाण्यास निघाले. यावेळी राष्ट्रीय महामार्गावरुन जात असतांना जुनो खेडी शिवाराकडील उजव्या बाजूने कारचे इंडिकेटर देवून जात होते. दरम्यान, समोरुन अचानक (एमएच १९ डीके ००४१) क्रमांकाचा बुलेटस्वारांनी त्यांच्या कारला धडक दिली. या अपघातात बुलेटचे चाक कारमध्ये अडकून ते दोघे बुलेटस्वार खाली पडले. यातील बुलेट चालविणार्‍याच्या पायाला दुखापत झाली आहे. दरम्यान, रविंद्र टाले हे अपघातग्रस्तांकडे गेले असता, त्या दोघांनी दारू पिल्याचे निदर्शनास आले. परिसरातील नागरिकांनी धाव घेवून जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी रविवार २६ जून रोजी दुपारी रविंद्र टाले यांच्या तक्रारीवरुन दोघ बुलेटस्वारांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.