जळगाव, प्रतिनिधी | शहरातून जात असलेल्या फोर-वे (हायवे) वरती शिव कॉलनी गट नं.५४, कडील भाग तसेच गुरुदत्त कॉलनी गट नं.४७ जळगाव येथील पादचारी भुयारी मार्ग काढून मिळावा अशी मागणी येथील नागरिकांनी मनोज भांडारकर यांच्या नेतृत्वात निवेदनाद्वारे केली आहे. यात खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, आयुक्त डॉ. उदय टेकाळे, स्थायी सभापती शुचिता हाडा आदींसह इतरांना प्रती देण्यात आल्या आहेत.
गेल्या तीन-चार महिन्यापासून शहरातून फोर वे हायवेचे काम प्रगती पथावर आहे. शिव कॉलनी परिसर, व गुरुदत्त कॉलनी भागात जमीन सपाटीकीरण, व मुरूम खडीकरणापर्यंत काम सुरु झालेले आहे.शिव कॉलनी परिसर हा जळगाव महापालिका मधीलसर्वात मोठा प्रभाग आहे. या परिसराला लागून कोल्हे नगर, आशाबाबा नगर, भूषण कॉलनी, पोष्टल कॉलनी, हरिविठ्ठल नगर व खाली वाघनगरचा परीसरापर्यान्तचा भाग आहे. हा भाग ३० ते ४० हजार लोकवस्तीचा असून त्या दृष्टीने एवढ्या मोठ्या परिसरामधून बरेचशे, नोकरदार, कंपनी वर्कर, रोजंदारी करणारे लोक व मुले शाळेत ये-जा करण्या करीता शिव कॉलनी लगतचा आताचा अस्तित्वात असलेला हायवेचा वापर स्वत:चा जीव धोक्यात घालून क्रॉस करून शहरात आपआपल्या कामानिमित्त जात येत असतात व त्यात खूप मोठ्या प्रमाणात दुर्घटना होत राहतात. यात आतापर्यंत ५०० ते ६०० नागरिकांना प्राण गमवावे लागले आहे. साधारण रोज १० ते १५ हजार लोकांची वरदळ या हायवे क्रोसिंग वरून होत असते. शहरातून जाणाऱ्या फोर वे हायवे करीता कालिंका माता चौक ते खोटे नगरपर्यंत तीन ठिकाणी भुयारी मार्गाचे नियोजन आहे. या नियोजनात शिव कॉलनीगट नं. ५४ ते गुरुदत्त कॉलनी पालीकाडीला गट नं. ४७ हायवे कडील पूर्वेचा भाग रेल्वे पुलाजवळील उंचावर असलेल्या भागातून एक भुयारी पादचारी मार्ग काढून मिळावी अशी मागणी केली आहे. या भुयारी पादचारी मार्गामुळे या मोठ्या परिसराला लाभ मिळणार असून पादचारी भुयारी मार्ग पुलाजवळील भागातून काढून गणेश कॉलनी भागाकडे काढल्यास तो मार्ग थेट कोर्ट चौकापर्यंत जाण्यास चाकरमाने व शाळेतील विद्यार्थी महिला वर्ग यांच्या सुरक्षेततेच्या हिताचा राहणार असल्याने हा पादचारी भुयारी मार्ग काढून मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर मनोज रमेश भांडारकर, मुकुंदराव गिरीधर पाटील, राजेश सोनवणे, आर. बी. जैन, मिलिंद सोनवणे, हितेश महाजन, प्रतिक महाजन, सुमेरसिंग राजपूत. मच्छिंद्र सोनवणे, विमल कुमावत, शांताराम निकम वसंत भोळे, रमेश गुरव, वसंत कापुरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.