जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |जळगाव शहरातील सागर नगरात असलेल्या इलेक्ट्रिक दुकानात प्रतिबंधित असलेला नायलॉनचा मांजा विक्री करणाऱ्या एका संशयित आरोपीला शनिपेठ पोलिसांनी मंगळवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता कारवाई करत अटक केली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र कैलास गोयल (वय-१९, रा.सागर नगर जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सागर नगरामध्ये प्रतिबंधित असलेला नायलॉनच्या मांजा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाले. त्यानुसार पथकाने कारवाई करत संशयित आरोपी महेंद्र कैलास गोयल (वय-१९, रा. सागर नगर जळगाव) याला अटक करून त्याच्याकडून साडेसहा हजार रुपये किमतीचा नायलॉनचा मांजा जप्त केला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय खैरे हे करीत आहे.
हे कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोलीस नाईक किरण वानखेडे, विकी इंगळे, मुकुंद गंगावणे यांच्यासह इतर पथकाने कारवाई केली.